
मुंबई प्रतिनिधी
मान्सूनचा निरोप घेतल्यानंतर हवामानाचा कहर पुन्हा एकदा डोके वर काढतोय. भारतीय हवामान खात्याने (IMD) चक्रीवादळाचा गंभीर इशारा दिला असून, देशातील तब्बल ११ राज्यांमध्ये पुढील २४ तासांत त्याचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
India Meteorological Department issues orange colour alert for Tamil Nadu today.
The weather agency forecasts heavy to very heavy rainfall in Puducherry and Karaikal.
IMD says the conditions of heavy rainfall are likely to prevail over parts of Andhra Pradesh, Karnataka,… pic.twitter.com/7Z2C9nujvM
— All India Radio News (@airnewsalerts) October 21, 2025
अंदमान-निकोबार बेटांपासून सुरुवात होणारे हे चक्रीवादळ दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणार असून, त्याचा परिणाम केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात जाणवेल.
IMDच्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबरपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून, पुढील काही तासांत ते ‘चक्रीवादळा’त रूपांतरित होईल.
• ४ राज्यांसाठी ‘विनाशकारी’ इशारा
हवामान विभागाने केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, समुद्र खवळलेला राहील. किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
• उत्तर व पश्चिम भारतातही परिणाम
या चक्रीवादळाचा फटका फक्त दक्षिणेकडेच नाही, तर उत्तर व पश्चिम भारतालाही बसणार आहे. कोकण-गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
• अंदमानात आधीच सुरुवात
अंदमान-निकोबार बेटांवर आधीच ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू लागले असून, स्थानिक प्रशासनाने बंदरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस हा ‘चक्रीवादळाचा कहर’ भारताच्या विविध भागांत विनाशक पावसाचा आणि जोरदार वाऱ्यांचा अनुभव देणार आहे.