
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. IQAir च्या जागतिक अहवालानुसार, मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावरून सरळ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हवा 221 AQI पर्यंत प्रदूषित झाली, तर बीकेसीमध्ये हे प्रदूषण 300 AQI पेक्षा जास्त नोंदवण्यात आले. कुलाबा (210), देवनार (207), खेरवाडी (214), माझगाव (196), शिवाजी नगर (169), मालाड (162), भायखळा (161) या भागात हवेची गुणवत्ता धोकादायक स्तरावर आहे.
AQI संकेतस्थळानुसार, काही ठिकाणे अशी आहेत:
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट – 200
मालाड – 220
मालाड पश्चिम – 221
नेव्ही नगर कुलाबा – 257
शीव – 191
माझगाव – 198
दिल्लीसुद्धा प्रदूषणाच्या कठीण स्थितीत आहे. सोमवारी सायंकाळी दिल्लीत ३४ ठिकाणी प्रदूषणाचे स्तर रेड झोनमध्ये नोंदवले गेले होते. रात्री AQI 531 पर्यंत वाढल्याने राजधानीची हवा आधीच विषारी झाली आहे.
विशेषत, दिवाळीच्या सणात फटाके फोडल्याने हवेचा दर्जा आणखी खालावला आहे, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन आहे.