स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : वाकोला परिसरात अल्पवयीन मुलीचा खून करून पत्नीला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने बिहार राज्यातून अटक केली आहे. आरोपीचे नाव मो. सुलेमान रज्जाक कुजरा (वय ४०) असे असून तो शिवनगर चाळ, ओल्ड सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूज (पूर्व), मुंबई येथे राहणारा आहे.
ही घटना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री घडली होती. कौटुंबिक वादातून सुलेमानने आपल्या पत्नी नसीमा (वय ३५) आणि मुलगी असगरी (वय १४) यांच्यावर जड वजनदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी असगरीचा मृत्यू झाला, तर पत्नी नसीमा गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आरोपीने मोबाईल बंद करून मुंबईतून पलायन केले होते. आरोपी बिहारमधील आपल्या मूळ गावी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने आरोपीला बिहारमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला वाकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, सह आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निशीथ मिश्रा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप पोलीस आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पश्चिम)प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत कक्ष ८, मुंबईचे प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, पोनि विशाल राजे (कक्ष-१०), सपोनि महेंद्र पाटील (कक्ष-९), सपोनि मनोजकुमार प्रजापती, सपोनि राहुल प्रभु, सपोनि संग्राम पाटील, सपोनि रोहन बगाडे, पोउपनि सुजित म्हैसधुने (कक्ष-९), सफौ इंदप, पोह महेंद्र यादव, पोह किणी, पोह सचिन काकडे, पोह पाटील, पोह बाराहाते, पोह गुंड, पोह सोनवणे, पोह अतिग्रे, पोशि रहेरे, पोशि राहुल सकट, पोशि योगेश काकड, आणि पोशि योगेश सटाले यांनी सहभाग घेतला.
गुन्हे शाखेच्या तात्काळ कारवाईमुळे फरार आरोपीला अटक करण्यात यश आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.


