
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पश्चिम येथील पाली हिल या उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांच्या घरी चोरी करणाऱ्याला खार पोलिसांनी अटक केली.
ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांच्या घरी रंगकाम करणाऱ्या इसमाला खार पोलीसांनी नुकतीच अटक केली. त्याच्याकडून सुमारे १ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
वांद्रे पश्चिम पाली हिल येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री पुनम ढिल्लोन यांच्या
घरातील रंगकाम करणाऱा आरोपी समीर सलीम अन्सारी ३७ याला खार पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून कानातील डायमंडचे टॉप तसेच रोख रक्कम २६ हजार रुपये असा १ लाख २६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे वैभव काटकर, तपास अधिकारी दत्ता कोकणे. स पो नि उ,मनोज वैद्य,
पोलीस अमलदार निकम, जाधव,गळवे,कदम, यांनी आरोपीला अटक केली.