
मुंबई प्रतिनिधी
सणासुदीचा माहोल रंगत असताना दादरकरांसाठी पुन्हा एकदा खरेदीचा उत्सवी मेळा भरविण्यात येत आहे. ‘मोरया इव्हेंट्स’तर्फे दिवाळी स्पेशल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, हा उपक्रम ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वनिता समाज हॉल, शिवाजी पार्क, दादर (प) येथे पार पडणार आहे. प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत खुले राहील.
या प्रदर्शनात दागिने, एथनिक साड्या, ड्रेस मटेरियल, रेडीमेड ब्लाउज, लहान मुलांचे कपडे, गृहसजावट साहित्य, गिफ्ट आयटम्स, बॅग्स, पर्सेस, फॅशन प्रॉडक्ट्स आणि पॅक फूड अशा विविध वस्तूंचा संगम पाहायला मिळणार आहे. पारंपरिकतेची झलक आणि आधुनिक फॅशनचा संगम असलेले हे प्रदर्शन सणासुदीच्या खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.
प्रदर्शनात प्रत्येकासाठी काहीतरी खास असेल, अशी आयोजकांची माहिती आहे. अमिषा पाटील यांचा स्टॉल क्रमांक F-8 विशेष आकर्षण ठरणार असून, त्यांच्या कलात्मक वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीच्या निमित्ताने सजलेला हा खरेदीचा उत्सव दादरकरांसाठी केवळ शॉपिंगपुरता मर्यादित नसून, तो पारंपरिक आणि नव्या ट्रेंडचा अनुभव घेण्याची एक उत्तम संधी ठरणार आहे.