
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती. महा मुंबई मेट्रोकडून मार्गिका ७ (गुंदवली–ओवरीपाडा) आणि मार्गिका ९ (दहिसर पूर्व–काशीगाव) या दोन्ही मार्गांच्या एकत्रीकरणाचे तसेच सुरक्षा चाचण्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर १२ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मेट्रो मार्गिका २ए (दहिसर पूर्व–डी.एन. नगर) आणि मार्गिका ७ वरील सकाळच्या मेट्रो सेवांच्या वेळेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
या बदलानुसार, या दोन्ही मार्गांवरील पहिली मेट्रो सेवा नेहमीपेक्षा काही मिनिटांनी उशिरा सुरू होईल. हा बदल ‘लाल मार्गिका विस्तार’ प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा असून, अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान अखंडित प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
सध्या मार्गिका ७ वर १३ स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू आहे, तर मार्गिका ९ चे काम अंतिम टप्प्यात आले असून, दोन्ही मार्ग एकत्र झाल्यानंतर पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सुसंगत होणार आहे.
सुधारित मेट्रो वेळापत्रक (१२ ते १८ ऑक्टोबर २०२५)
डहाणूकरवाडीहून
गुंदवलीकडे पहिली मेट्रो
• सोम–शुक्र : सकाळी 07:01
• शनिवार : सकाळी 07:00
• रविवार : सकाळी 07:04
अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो
• सोम–शुक्र : सकाळी 07:06
• शनिवार : सकाळी 06:58
• रविवार : सकाळी 06:59
दहिसर पूर्वहून
अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो
• सोम–शुक्र : सकाळी 06:58
• शनिवार : सकाळी 07:02
• रविवार : सकाळी 07:02
गुंदवलीकडे पहिली मेट्रो
• सोम–शुक्र : सकाळी 06:58
• शनिवार : सकाळी 07:06
• रविवार : सकाळी 07:01
अंधेरी पश्चिमहून
• गुंदवलीकडे पहिली मेट्रो
• सोम–शुक्र : सकाळी 07:01
• शनिवार : सकाळी 07:02
• रविवार : सकाळी 07:04
गुंदवलीहून
अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो
• सोम–शुक्र : सकाळी 07:06
• शनिवार : सकाळी 07:02
• रविवार : सकाळी 07:00
प्रवाशांना आवाहन
महा मुंबई मेट्रोकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, या कालावधीत प्रवासाचे नियोजन करताना MumbaiOne (मुंबई वन) ॲप, महा मुंबई मेट्रोचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स, तसेच स्थानकांवरील सूचना फलक यांवर दिलेले अद्ययावत वेळापत्रक तपासावे.
प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, गुंदवली ते मिरा गावदरम्यान अखंड मेट्रो सेवा सुरू होणार असून, पश्चिम उपनगरांतील प्रवासाचा अनुभव अधिक जलद, सुलभ आणि सुसंगत होईल.
महा मुंबई मेट्रोने या कामात सहकार्य केल्याबद्दल प्रवाशांचे आभार मानले आहेत.