
नवी दिल्ली वृत्तसंस्था
सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवणारी बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंतच्या महानगरांमध्ये ही दरवाढ लागू झाली असून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कंपन्यांच्या खर्चात भर पडणार आहे.
महानगरांतील नवे दर (१९ किलो व्यावसायिक सिलिंडर)
शहर जुना दर (₹) नवा दर (₹) वाढ (₹)
* दिल्ली १५८०.०० १५९५.५०. १५.५०
* मुंबई १५३१.५०. १५४७.००. १५.५०
* चेन्नई १७३८.५०. १७५४.००. १५.५०
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा दरवाढ झाल्याने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
घरगुती ग्राहकांसाठी दिलासा
१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. ग्राहकांना जुन्या दरांवरच सिलिंडर मिळणार आहेत.
घरगुती सिलिंडरचे दर (₹ मध्ये)
* दिल्ली : ₹८५३.००
* मुंबई : ₹८५२.५०
* पुणे : ₹८५६.००
* लखनऊ : ₹८९०.५०
* पटना : ₹९४२.५०
* हैदराबाद : ₹९०५.००
* बेंगलुरू : ₹८५५.५०
* गाजियाबाद : ₹८५०.५०
उज्ज्वला योजनेतील महिलांसाठी दिवाळी भेट
उत्तर प्रदेश सरकारने उज्ज्वला योजनेच्या १.८५ कोटी महिलांना दिवाळीपूर्वी म्हणजेच २० ऑक्टोबरपर्यंत मोफत गॅस रिफिल देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाची माहिती दिली.
२०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश म्हणजे गरीब महिलांना धुरापासून मुक्तता मिळवून देणे व स्वच्छ इंधनाची सोय करणे हा आहे.
मागील सहा महिन्यातील दरकपात
मार्च २०२५ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यात आली होती. सहा महिन्यांत दर २२३ ते २२९ रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र आता पुन्हा साडे पंधरा रुपयांनी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना खर्चाचे गणित पुन्हा मांडावे लागणार आहे.