
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
भाईंदर : रायगाव (भाईंदर पश्चिम) येथील तलावाजवळील चाळीतील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एमबीव्हीव्ही (MBVV) पोलिसांनी छापा घालत अठरा जुगार्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे पाच लाखांची रोकड आणि १६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
जोन १ चे पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण (आयपीएस) यांना मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर जोन १ डीसीपी कार्यालयातील पथक, मीरा रोड व भाईंदर पोलिस ठाण्याच्या संयुक्त चमूने हा छापा टाकला.
या धाडीत पोलिसांनी अठरा जुगार्यांना पकडून त्यांच्याकडून रोकड व मोबाईल हस्तगत केले. तथापि, जुगार अड्डा चालवणारा मुख्य आरोपी फरार असून पोलिसांनी त्याला वॉण्टेड घोषित केले आहे.
ही कारवाई डीसीपी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष सांगविकर (मीरा रोड पोलिस ठाणे), पीएसआय अजय मांडोळे तसेच जोन १ डीसीपी कार्यालय व मीरा रोड व भाईंदर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास व कायदेशीर कारवाई भाईंदर पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.