
पत्रकार :उमेश गायगवळे
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील महत्त्वाचा भाग असलेल्या पिसे व पांजरापूर येथील उपकेंद्र बंधारा शुद्धीकरण प्रकल्प पाणी गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा, या ठिकाणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज पाहणी केली.
पिसे येथील १०० के व्हि क्षमतेच्या विद्युत केंद्रामध्ये काही दिवसापूर्वी बिघाड झाला होता. अभियंते कामगार कर्मचाऱ्यांनी औरत ना प्रयत्न करत विद्युत उपकेंद्राची आव्हानात्मक दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत केला. ही कामगिरी बजावलेल्या जले अभियंता खात्यातील कामगार कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे पालिका आयुक्त गगराणी यांनी कौतुक केले.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या समवेत जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे उपजल अभियंता राजेंद्र वाडेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते पालिका आयुक्तांनी केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केल्याने आस्तेवाईक संवाद साधल्यामुळे कामगार, कर्मचारी भारावून गेले होते.