
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता सरकारने मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी धावणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. वाहतूक कोडींपासून मुंबईकरांची सुटका व्हावी, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत पॉड टॅक्सी धावणार
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने हे पुढचे पाऊल उचलले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रवाशांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना कामाच्या ठिकाणी खूप जास्त प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकदा कामाच्या कालावधीत ट्राफिकचा सामना करावा लागतो. यामुळे वाहतूकीवरील वाढता ताण कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी सुरु केली जाणार आहे. लवकरच ही पॉड टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.
कुर्ला ते वांद्रा धावणार पॉड टॅक्सी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की, कुर्ला ते वांद्रा स्थानकादरम्यान ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’ मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी बुलेट ट्रेन, मुंबई उच्च न्यायालय असणार आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. यामुळे भविष्यात या ठिकाणी ताण वाढणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी अनेक अडचणी येतील. भविष्यात या भागात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये.सहजरित्या प्रवास व्हावा, यासाठी पॉड टॅक्सी हा बेस्ट पर्याय ठरेल.
मुंबईत सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या कार्डद्वारे पॉड टॅक्सीचा वापर करता येणार आहे. या दृष्टीने पुढची पाऊले उचलली जाणार आहे. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला व वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा, असं सांगण्यात आले आहे.वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात, असंही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.