
मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भारताची जागतिक प्रतिमा बदलणारे जागतिक नेते म्हटले आहे.
असंख्य भुजाओं की शक्ति है,
हर तरफ देश की भक्ति है!
तुम उठो तिरंगा लहरा दो,
भारत के भाग्य को फहरा दो,
यही समय है, सही समय है!
भारत का अनमोल समय है!आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याच कवितेतील या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या ओळी! नव्या भारताचा संकल्प सोडून आदरणीय मोदीजींनी… pic.twitter.com/NaBjOA7Mvs
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 17, 2025
तसेच एकनाथ शिंदे यांनी प्रतीकात्मक भेट म्हणून एक नवीन राज्य उपक्रमाची घोषणा केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वतः मोदींनी लिहिलेले श्लोक शेअर केले आहे. यामध्ये ‘असंख्य शस्त्रांची ताकद आहे, सर्वत्र देशभक्ती आहे! तुम्ही उठा आणि तिरंगा फडकावा, भारताचे भाग्य उडू द्या, हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे, हा भारताचा मौल्यवान वेळ आहे’ लिहले आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्तीने भरलेले आणि पंतप्रधानांच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आहे.
त्याचपुढे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ज्या भारताला ‘विकसनशील देश’ म्हणून जागतिक पातळीवर काहीसं हिणवलं जात होतं, त्या भारताच्या महानतेचा डंका विश्वात वाजत आहे. अखिल विश्वात भारताचा तिरंगा दिमाखाने फडकवणारे महान नेते आज ७५ वर्षांचे तरुण म्हणून तितक्याच उमेदीनं, तडफेनं, जिद्दीनं कार्यमग्न आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या विकासयात्रेतले आपण यात्रेकरु असून २०४७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्याच्या या महान यज्ञात आपलाही सहभाग असावा, असे पोस्ट्मध्ये म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान मोदी आमचे नेते आहेत, याचाच आम्हा सर्वांना विलक्षण अभिमान वाटतो. ७५ व्या जन्मदिनानिमित्त त्यांना शिवसेनेच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा! विश्वनेते पंतप्रधान मोदी यांना उत्तम आरोग्यासह दीर्घ आयुष्य प्राप्त होवो, आणि बलसागर भारताचं स्वप्न आम्हा सर्वांच्या साक्षीनं साकार होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
नमो पार्क योजनेची घोषणा
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट म्हणून एक नवीन राज्य उपक्रमाची घोषणा केली. त्यांच्या कार्यालयाने ‘नमो पार्क’ नावाची उद्याने विकसित करण्यासाठी महाराष्ट्र ३९४ नगरपालिका आणि नगर परिषदांना प्रत्येकी १ कोटी रुपये वाटप करणार असल्याचे जाहीर केले. या उद्यानांना ‘नमो पार्क’ असे म्हटले जाणार असून ही महाराष्ट्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भेट आहे,” असे शिंदे म्हणाले.