
पत्रकार: उमेश गायगवळे
पश्चिम उपनगरातील वांद्रे रेल्वे स्थानक हे गर्दीचे आणि महत्त्वाचे स्थानक मानले जाते. वांद्रे स्थानकाच्या पूर्वेस असणाऱ्या म्हाडा कार्यालय, वांद्रे न्यायालय, भविष्य निर्वाह निधी, इंडियन ऑइल, वांद्रे कुर्ला संकुल, शासकीय वसाहत तसेच अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय आहेत. मात्र काही मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वांद्रे स्थानकाच्या पूर्वी कडून वांद्रे कुर्ला संकुलात जाण्यासाठी शेअर रिक्षा प्रतिव्यक्ती ३० ते ४० रुपये आहे. मात्र इथून अवैधरीक्षा तीन प्रवाशांच्या ऐवजी चार ते पाच प्रवाशांना कोबून रिक्षा चालक भेदाकारपणे रिक्षा चालवत आहेत. त्यांच्याकडे वाहतूक पोलिसांचा कानाडोळा असल्याने दिसून येते. तसेच इथून खार पूर्व शासकीय वसाहत, निर्मल नगर, जवाहर नगर, सिद्धार्थ नगर, आदी ठिकाणी रिक्षाचालक मीटरने प्रवास सर्रास भाडे नाकारतात काही रिक्षा चालक परवांच्या सोबत अरेरावी ही करत असल्याचे प्रवासी सांगतात त्यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये नेहमीच खटके उडताना दिसत आहेत. येथून पूर्वेकडे जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला शासकीय कर्मचारी महिलांना चालक भाडे नाकारत असल्याने प्रचंड मनस्तापला सामोरे जावे लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. काही रिक्षा चालक विना गणवेश विनापरमेंट वाहन परवाना नसताना रिक्षा चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
अशा मुजोर रिक्षा चालकांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे. तसेच या मुजोर रिक्षा चालकावर संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.