
वांद्रे प्रतिनिधी
मुंबई – वांद्रे विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुखपदी पुन्हा एकदा कुणाल सरमळकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे मार्गदर्शन तसेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
याशिवाय सरमळकर यांना विमानतळ प्रमुखपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक तसेच महिला व युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
“वांद्रे विभागाचा विकास, विमानतळ कामगार सेना तसेच सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचारी बांधवांच्या हितासाठी निष्ठेने काम करू,” असा विश्वास कुणाल सरमळकर यांनी व्यक्त केला.