
मुंबई प्रतिनिधी
मुंबईसारख्या महागड्या शहरात व्यवसाय सुरू करायचा पण दुकानाच्या भाड्याचे ओझे पेलवेनासे झाले आहे? तर आता म्हाडा (मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ) घेऊन आलंय खास संधी. गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेले तब्बल १४९ अनिवासी गाळे ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. अर्जाची अंतिम मुदतही वाढवून १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
कुठे मिळणार गाळे?
म्हाडाच्या यादीनुसार खालील भागांत दुकानं विक्रीसाठी खुले करण्यात आली आहेत –
* मालवणी, मालाड – ४६ गाळे
* कोपरी, पवई – २३ गाळे
* चारकोप – २३ गाळे
* बिंबिसार नगर, गोरेगाव (पूर्व) – १७ गाळे
प्रतीक्षा नगर, सायन – ९ गाळे
* महावीर नगर, कांदिवली (पश्चिम) – ६ गाळे
* मुलुंड, गव्हाणपाडा – ६ गाळे
* जुने मागाठाणे, बोरीवली (पूर्व) – ६ गाळे
* कुर्ला, स्वदेशी मिल – ५ गाळे
* अँटॉप हिल, वडाळा – ३ गाळे
* शास्त्री नगर, सिद्धार्थ नगर, मजासवाडी (जोगेश्वरी पूर्व) – प्रत्येकी १ गाळा
* तुंगा, पवई – २ गाळे
ई-लिलावाच्या महत्वाच्या तारखा
* ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख – १६ सप्टेंबर २०२५, रात्री ११:५९ पर्यंत
* ई-लिलावाची तारीख – १८ सप्टेंबर २०२५, सकाळी ११ ते सायं. ५
* निकाल जाहीर होणार – १९ सप्टेंबर २०२५, सकाळी ११ वाजता
निकाल व अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे –
eauction.mhada.gov.in
mhada.gov.in
अर्जदारांसाठी आवश्यक अटी
* वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे बंधनकारक
* महाराष्ट्र राज्यातील २०१८ नंतरचे वैध रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक
मुंबईत स्वतःचं घर घेणं अनेकांसाठी दूरचं स्वप्न ठरत असताना, व्यवसायासाठी गाळे घेण्याची ही संधी सोडून देणं म्हणजे खरंच तोटा ठरणार आहे. म्हाडाची ही ई-लिलाव योजना उद्योजकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. कारण अशा ऑफर्स पुन्हा किती लवकर मिळतील, सांगता येत नाही!