
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | मुसळधार पावसाने रस्त्यावर राहणाऱ्यांचे हाल अक्षरशः हालहाल झालेले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शाखा क्र. ९२ चे शाखाप्रमुख रामचरण एस. चंदेलिया यांनी खर्या अर्थाने शिवसेनेची परंपरा जपत गरीबांच्या मदतीला धाव घेतली.
काल (दि. २० ऑगस्ट) पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे संसार कोलमडून पडले होते. झोपड्यांतून पाणी शिरल्याने रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबांची गैरसोय वाढली होती. या परिस्थितीची दखल घेत रामचरणजींनी स्वतःच्या खर्चाने ताडपत्री वाटप करून गरिबांना तातडीचा दिलासा दिला.
“नेहमीच शिवसेना ही संकटात असलेल्या जनतेच्या पाठीशी उभी राहिली आहे. आजही त्याच परंपरेनुसार आम्ही आमच्या लोकांच्या मदतीला धावून जातो,” असे सांगत रामचरणजींनी आपली भूमिका स्पष्ट केली.
स्थानिकांनी यावेळी मोठ्या संख्येने हजेरी लावून शाखाप्रमुखांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. “पावसात डोक्यावर छप्पर देणारे रामचरणजी आमच्यासाठी देवदूतच आहेत,” अशी कृतज्ञ प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.