
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता महिलेने या मद्यपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना (दि.१८) समोर आली आहे. शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षिका या आपल्या पती आणि मुलासोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या.
बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित महिलेने त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलासोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने त्यांची छेड काढली. मात्र, घाबरून न जाता प्रिया यांनी तत्काळ रुद्रावतार धारण करून त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवारवाड्याजवळील पोलीस चौकीत घेऊन गेल्या.
परंतु, पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डाबून ठेवत प्रिया यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला. यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले.
विशेष म्हणजे, त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवाशांनी या घटनेत कोणतीही मदत न करता बस सोडून दुसऱ्या बसमध्ये जाणे पसंत केले. याबाबत प्रिया लष्करे यांनी नाराजी व्यक्त केली असून, “आज महिलांनी एकत्र येऊन अशा घटनांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. एकीनेच आपण महिलांवरील अत्याचार रोखू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.