
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! महायुती सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला थेट बँक खात्यात जमा होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून ही खुशखबर दिली.
“लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना १५०० रुपयांचा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा केला जाईल,” असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
२६.३४ लाख महिलांचा हप्ता बंद
या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असला तरी पात्रतेबाबत तपासणी सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने विविध शासकीय विभागांकडून माहिती मागवून केलेल्या पडताळणीत धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार, तब्बल २६.३४ लाख महिलांना ही योजना अपात्र ठरत असून त्यांचा लाभ तातडीने बंद केला जाणार आहे.
याआधी १४,२९८ पुरुषही योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले होते. त्यांना त्वरित वगळण्यात आले. या घडामोडींमुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 1, 2025