
मुंबई-प्रतिनिधी
वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार वरुण सरदेसाई यांची हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.
चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व येथील रहिवाशांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व येथील वर्ग २ व वर्ग ३ च्या अधिकारी/ कर्मचारी रहिवाशांना उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप विभाग १, वांद्रे यांनी जबरदस्तीने वर्ग ४ करीता राखीव असलेल्या इमारतींमध्ये स्थलांतरीत होण्याबाबत आदेश काढले आहेत. परंतु सदर वर्ग ४ च्या इमारतींऐवजी ज्या इमारती उच्च न्यायालयाच्या बांधकाम क्षेत्रात मोडत नाहीत अशा वांद्रे शासकीय वसाहतीतील ‘ब’ प्रकारच्या रिक्त २१० सदनिकांमध्ये या वर्ग २ व वर्ग ३ च्या रहिवाशांची व्यवस्था करण्याबाबत आमदार वरुण सरदेसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली. तसेच या रहिवाशाना सदर स्थलांतरणास मे २०२५ पर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात यावी अशी मागणी केली.