
वांद्रे-प्रतिनिधी
साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित कै. भाऊसाहेब रानडे नवदीत मल्लखांब स्पर्धा भव्य उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, आणि नवी मुंबई येथून 800 हून अधिक मल्लखांबपटू तसेच 140 हून अधिक जिम्नॅस्टिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
शिवसेना विभाग प्रमुख श्री कुणाल सरमळकर यांनी या स्पर्धेसाठी खास उपस्थिती लावून खेळाडूंना सदिच्छा दिल्या व त्यांचा उत्साह वाढवला. त्यांनी बक्षीस वितरण करून विजेत्यांचा गौरव केला आणि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
खेळाडूंच्या मेहनतीला आणि चिकाटीला दाद देत, त्यांनी या उपक्रमामुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.