
मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव येथे कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे एक सुवर्णसंधीच ठरणार आहे.
पदांची नावे आणि आवश्यक पात्रता:
महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार (https://portal.mcgm.gov.in/Prospects/Careers-All), या भरतीअंतर्गत खालील पदांवर नियुक्ती केली जाणार आहे:
* क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आवश्यक
* ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट – ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी पदवी आवश्यक
* स्पीच थेरपीस्ट-कम-ऑडिओलॉजिस्ट
* ब्लड बँक टेक्निशियन
* ई.सी.जी टेक्निशियन – विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण व कार्डिओ टेक्नोलॉजीमधील बी.एससी
* न्युरोलॉजी टेक्निशियन – बी.पी.एम.टी. अंतर्गत पदवी
* लॅब टेक्निशियन – बी.एससी पॅरामेडिकल टेक्नोलॉजीसह इंटर्नशिप आवश्यक
* नेत्रतज्ज्ञ
या भरतीअंतर्गत एकूण १९ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२५ आहे. अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा:
आवक विभाग, एल.टी.एम.जी. रुग्णालय, शीव, मुंबई
पगाराची रक्कम:
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे.
ही भरती कंत्राटी पद्धतीने असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात आणि अर्जाची माहिती वाचून अर्ज पाठवावा.