
मुंबई प्रतिनिधी
रेल्वेची नोकरी हवीय का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून 6238 टेक्नीशियन पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी नंतर ITI किंवा डिप्लोमा/इंजिनीयरिंग पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
* अर्ज सुरू: सुरु आहे
* अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 जुलै 2025
* शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 30 जुलै 2025
*फॉर्ममध्ये दुरुस्तीची मुदत: 1 ते 10 ऑगस्ट 2025
एकूण जागा – 6238
पदाचे नावजागाटेक्नीशियन ग्रेड-I (सिग्नल)183टेक्नीशियन ग्रेड-III6055➤ यात सर्वाधिक – फिटर (PU & WS)2106
शैक्षणिक पात्रता:
* टेक्नीशियन ग्रेड-I (सिग्नल):
B.E/B.Tech / इंजिनीयरिंग डिप्लोमा / B.Sc (इंजिनिअरिंग)
*टेक्नीशियन ग्रेड-III (ओपन लाइन/वर्कशॉप):
ITI संबंधित ट्रेडमध्ये + 10वी उत्तीर्ण किंवा
12वी (PCM विषयांसह)
वयोमर्यादा (1 जुलै 2025 रोजी):
* ग्रेड-I (सिग्नल): 18 ते 33 वर्षे
* ग्रेड-III: 18 ते 30 वर्षे
अनुसूचित जाती, जमाती, इ. वर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत लागू
वेतन श्रेणी:
पदवेतन स्तरदरमहा पगारटेक्नीशियन ग्रेड-I (सिग्नल)स्तर-5₹29,200/-टेक्नीशियन ग्रेड-IIIस्तर-2₹19,900/-
अर्ज कसा कराल?
* rrbapply.gov.in या वेबसाइटला भेट द्या
* होमपेजवर ‘CEN No. 02/2025 – टेक्नीशियन भरती 2025’ लिंकवर क्लिक करा
* आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा
* लॉगिन करून अर्ज भरावा
* डॉक्युमेंट्स अपलोड करा
* शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा
संपूर्ण माहिती व अधिकृत नोटिफिकेशनसाठी rrbapply.gov.in वर त्वरित भेट द्या.