
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने मोठा निर्णय घेत २४ पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे अधिकृत आदेश सोमवारी जारी करण्यात आले. यामध्ये मुंबई पोलीस दलात एका उपायुक्ताची नियुक्ती झाली असून अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
गृहविभागाने दिलेल्या माहितीनुसार, विनायक लगारे यांना पदोन्नती देऊन मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, प्रदीप इंगळे आणि कृष्णात पिंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये, मंगेश चव्हाण यांची लातूरच्या पोलीस अधीक्षक पदावर, अभिजीत धाराशिवकर यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागात, तर पद्मजा चव्हाण यांची अहिल्यानगरमधील राज्य राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
याशिवाय अन्य बदल्यांमध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे:
* योगेश चव्हाण – राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
* अशोक थोरात – अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ
* अमोल झेंडे – दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्राधिकरण
* सागर पाटील – सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई
* स्मिता पाटील – पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
* जयंत बजबळे – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे
* सुनील लांजेवार – उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, संभाजीनगर
* जयश्री गायकवाड – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर
* रत्नाकर नवले – पोलीस उपायुक्त, संभाजीनगर
* प्रशांत बच्छाव – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक
* नम्रता पाटील – पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे
* अमोल गायकवाड – पोलीस अधीक्षक, बुलढाणा
* पियुष जगताप – समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, चंद्रपूर
* बजरंग बनसोडे – पोलीस अधीक्षक, दहशतवादी विरोधी पथक, संभाजीनगर
* ज्योती शिरसागर – पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण, कोल्हापूर
* सोमनाथ वाघचौरे – पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर
दरम्यान, नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि ठाण्याचे पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण) दीपक देवराज यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही बदल्यांची यादी राज्य प्रशासनात नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असून, बदल्यांमुळे गुन्हेगारी नियंत्रण, गुप्तवार्ता आणि दहशतवाद विरोधी उपाययोजनांना अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.