
मुंबई प्रतिनिधी
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष नंदकुमार काटकर आदी उपस्थित होते.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “लोकशाहीतील मान्यवर नेत्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.