
मुंबई प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नाला आता पंख लागणार! म्हाडाकडून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात गृहप्रकल्पांची भव्य लॉटरी जाहीर करण्यात आली असून, अवघ्या ५ लाख रुपयांपासून घर मिळवण्याची सुवर्णसंधी नागरिकांना चालून आली आहे.
लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
या गृहनिर्माण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये १३५१ घरे, तर नाशिक विभागात १४८५ घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया ३० जून २०२५ पासून सुरू झाली असून, ११ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत आहे. अर्ज म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in भरता येणार आहे.
शुल्क भरण्याची अंतिम तारीख : १२ ऑगस्ट २०२५
अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी
नाशिक विभाग:
▪️ वडाळा शिवार – पार्श्वनाथ प्रोजेक्ट:
किंमत: ₹१२.६८ लाख ते ₹१३.५५ लाख
▪️ अडगाव शिवार – प्रणव गार्डन:
किंमत: ₹११.९४ लाख ते ₹१५.३१ लाख
▪️ सावेडी, अहिल्यानगर (मध्यम उत्पन्न गट):
विशेष आकर्षण: फक्त ₹५.४८ लाखांत घर
छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पांची झलक
▪️ नक्षत्रवाडी – प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत:
१०५६ घरे – ₹१५.३० लाख
▪️ चिखलठाणा:
१५८ घरे – ₹२७ लाख
▪️ देवळाई:
१४ घरे – ₹१३.१९ लाख ते ₹१६.१९ लाख
▪️ आनंद पार्क:
१८ घरे – फक्त ₹४.८५ ते ₹६.२७ लाख!
▪️ बीड – अंबाजोगाई प्रकल्प:
९२ घरे – ₹१०.६५ लाख
घरे कोणत्या योजनांतर्गत उपलब्ध?
▪️ प्रधानमंत्री आवास योजना – ११४८ सदनिका
▪️ म्हाडा गृहनिर्माण योजना – १६४ सदनिका
▪️ २०% सर्वसमावेशक योजना – ३९ सदनिका
या सुवर्णसंधीकडे पाठ न फिरवता आजच अर्ज करा!
महानगरात हक्काचं घर मिळवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी हीच योग्य वेळ! अल्प गुंतवणुकीत उत्तम दर्जाचं घर हवं असल्यास, म्हाडाच्या या लॉटरीत सहभाग घेणे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.