
रतलाम वृत्तसंस्था
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हा गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार रतलाम जिल्ह्यात घडला आहे. ढोसी गावातील भारत पेट्रोलियमच्या पंपावर हा प्रकार घडल्याने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित पेट्रोल पंप तात्काळ सील करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री मुख्यमंत्री यादव यांचा ताफा ‘एमपी राईज 2025’ या कॉन्क्लेव्हसाठी रतलामच्या दिशेने निघाला होता. वाटेत ढोसी गावातील पेट्रोल पंपावर गाड्यांना डिझेल भरण्यात आले. मात्र इंधन घेतल्यानंतर काही अंतरावरच ताफ्यातील अनेक गाड्या एकामागून एक बंद पडल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला.
मध्य प्रदेश के मिलावटखोर भी गजब हैं..
सीएम की फ्लीट में शामिल गाड़ियों में ही पानी मिला डीजल भर दिया.. सीएम को आज दौरे पर जाना था.. कल रात सीएम की फ्लीट में चलने वाली 19 इनोवा कारों में डीजल भरने के लिए स्टाफ रतलाम के डोसीगांव स्थित भारत पेट्रोल पंप पहुंचे. सभी गाड़ियों के टैंक… pic.twitter.com/lB8e01jMOR— Vivek K. Tripathi (@meevkt) June 27, 2025
तपासादरम्यान जे समोर आले, त्याने अधिकारीही थक्क झाले. गाड्यांचे इंधन टाकी उघडून पाहिल्यावर त्यात २० लिटर डिझेलमध्ये तब्बल १० लिटर पाणी असल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नव्हे, तर नुकताच २०० लिटर डिझेल भरून गेलेला एक ट्रकही रस्त्यातच बंद पडल्याचे स्पष्ट झाले.
पेट्रोल पंपच बनले गॅरेज
या प्रकारामुळे ढोसी गावातील पेट्रोल पंपावर एकच गर्दी उसळली. पेट्रोल पंपावरच गाड्यांचे टँक उघडून साफसफाई व तपासणी सुरू झाली. सायंकाळी १० वाजताच्या सुमारास घडलेली ही घटना संपूर्ण प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसाठी डोकें दुखी झालेली होती.