पुणे प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्हमहत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना सध्या राज्यभरात एकच नाव गाजताना दिसते ते म्हणजे हगवणे… मुळशी भागात प्रस्थ असलेलं हगवणे कुटुंब सध्या मात्र बदनामीच्या चक्रव्यूहात अडकलंय. सून वैष्णवी कस्पटे हिच्या कुटुंबीयांना एक- दीड कोटी खर्च करून लग्न करायला सांगणाऱ्या या हगवणे कुटुंबाचा स्वतःचा व्यवसाय काय?
या सगळ्यांचा म्होरक्या असलेला राजेंद्र हगवणे याची स्वतःची संपत्ती किती ? आणि ज्यांच्या विषयी तोंडातून ब्र काढायलाही गावकरी घाबरतात अशा हगवणे कुटुंबाचा इतिहास नेमका काय?
आता बदनामीचे आणि टिकेचे धनी झालेल्या हगवणे कुटुंबीयांनी मुळशीत स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे. या कुटुंबाचा इतिहास देखील सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासारखा आहे. हगवणे कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय हा शेती आणि दुधाचा होता. राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे तालुक्यातील विख्यात पैलवान होते. काही काळाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1980 मध्ये पहिल्यांदा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले, नंतर सभापतीही झाले.
त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा राजेंद्र हगवणे यांनी शरद पवारांनी काँग्रेसला सोडून वेगळा राष्ट्रवादीची स्थापना केल्यावर राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2004 साली राजेंद्र हगवणे याने राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुळशीतून विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. हगवणे हे 65 हजार 594 मतं मिळवत दुसऱ्या स्थानी राहिले होते. पुढे ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षही झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवली पण पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. मात्र राजेंद्र यांनी केवळ राजकारणातच हातपाय पसरले नव्हते तर शेती आणि दुधाच्या व्यवसायातून आलेले पैसे बिझनेस मध्ये गुंतवायला सुरुवात केली होती. तसेच शेकडो एकर जमिनीचे प्लॉट काढून सोन्याच्या भावात विकायला सुरुवात केली.
त्यातून हगवणे कुटुंबाची भरभराट झाली. याबरोबरच हगवणे कुटुंबियांकडे जेसीबी, पॉकलँड अशा मशिनरी आहेत. या भाड्याने देऊन बक्कळ पैसा कमावला जातो. दुसरीकडे राजेंद्र हगवणे यांची दोन्ही मुलं असतात आणि सुशील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यातूनच मोठी माया जमवल्यानंतर या दोघांनीही पिस्तुलाचे परवाने काढून घेतले. हे परवाने रद्द करण्याची मागणी ही आता होत आहे. दुसरीकडे या सगळ्या मोठ्या व्यवसायांबरोबर हगवणेंचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय देखील या कुटुंबाकडून केला जातो.
अशी माहिती हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हगवणे यांनी दिली. या सगळ्या व्यवसायामुळे राजेंद्र हगवणे यांची जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी राजेंद्र हगवणे यांनी चक्क आपल्याच वडिलांना लुटण्याचा प्लॅन केला होता. वडिलांच्या नकळत सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी कागदपत्र तयार करण्यात आली मात्र राजेंद्र यांचा हा प्लॅन फसला.
मात्र पैशाचा आणि प्रॉपर्टीचा हव्यास काही सुटला नाही. पुढे सुशील आणि शशांक या दोन्ही मुलांची लग्न लावताना भल्या मोठ्या हुंड्याची मागणी करण्यात आली. सुनांच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपये लाटण्यात आले. मोठी सून मयुरी या किंमत दाखवत हागवणेंच्या कथाकथित मोठ्या घरातून बाहेर पडल्या. व माहेरी जाऊन राहू लागल्याने या खेळातून त्यांना मुक्ती मिळाली. मात्र वैष्णवी या कुटुंबाच्या तावडीत सापडल्या. म्हणूनच कोट्यावधी खर्चून लग्न लावण्यात सांगितलं गेलं. आणि लग्नानंतरही हुंड्यासाठीचा जाच सुरूच राहिला. आणि यातच वैष्णवी यांना आपला जीव गमवावा लागला.


