
सातारा प्रतिनिधी
इलेक्ट्रिक कार निर्माता Tesla Inc. भारतात उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत असून, कंपनीने महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात युनिट स्थापन करण्यासाठी जागेचा शोध सुरू केला आहे.
यामुळे राज्यातील उद्योग क्षेत्रात आणि स्थानिक रोजगारात मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सातारा – टेस्लाच्या भारतीय स्वप्नांचं गेटवे
सूत्रांच्या माहितीनुसार, Tesla चे प्रतिनिधी गेल्या काही आठवड्यांपासून साताऱ्यात औद्योगिक भूखंडांची पाहणी करत आहेत. सध्या जागेच्या मालकी, लॉजिस्टिक सुलभता आणि सरकारी प्रोत्साहन याबाबत चर्चा सुरू आहे. या युनिटमध्ये सुरुवातीला कारचे पार्ट्स भारतात आणून असेंबलिंग केली जाणार आहे (CKD मॉडेल), आणि त्यानंतर उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल.
राज्य सरकारची सक्रीय भूमिका महाराष्ट्र सरकारने आधीच Tesla ला आकर्षित करण्यासाठी विविध कर सवलती, जमीन उपलब्धता आणि लॉजिस्टिक सुविधा यांसारखी प्रस्तावित पॅकेजेस दिली आहेत. ‘Make in India’ आणि ‘Green Mobility’ च्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची पावले मानली जात आहेत.
स्थानिक विकासाला चालना रोजगार: हजारो स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उद्योग क्षेत्र: सप्लाय चेन, पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसिंग यामध्ये छोटे-मोठे उद्योग तयार होण्याची शक्यता
इन्फ्रास्ट्रक्चर: रस्ते, वीज, पाणी, वायफाय सुविधा यामध्ये वेगाने सुधारणा होणार आहे.