
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत आजही अवकाळी पावसामुळे सर्वत्र प्रवाशांची दाणादाण उडाली आहे. तर, काही भागात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडवर गुलमोहराचे झाड चालत्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षा चालकासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती.
या दुर्घटनेत मुंबईच्या डबेवाल्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने डबेवाला असलेल्या खेंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे, डबेवाला संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतनिधीची मागणी केली आहे.
कल्याण परिसरात अवकाळी पाऊस आणि वारा होता. रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक मोठे गुलमोहराचे झाड चालत्या रिक्षावर कोसळले. या अपघात रिक्षाचालकासह तिघांचा मृत्यू झाला. जखमींना कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये रिक्षा चालक – उमा शंकर वर्मा वय अंदाजे 45 रा. मातोश्री नगर चिंचपाडा गाव, तुकाराम खेंगळे वय 50 रा. चिंचपाडा गाव आणि लता दत्ताराम राऊत वय 47 रा. साई समृद्धी चाळ रूम नंबर 5 चिंचपाडा गाव अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये तुकाराम खेंगळे या मुंबईच्या डबेवाल्याचा समावेश आहे
मंगळवारी रात्री मुंबई-ठाणे-कल्याण परिसरात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वादळवाऱ्यात चिंचपाडा कल्याण येथे रिक्षावर झाड कोसळून तुकाराम खेंगले या डबेवाला कामगाराचे अपघाती निधन झाले. त्यांच्यावर त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील पाईट ता. राजगुरूनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुकाराम खेंगळे अनेक वर्ष मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करत होते. दिवसभर मुंबईत डबे पोहचवणाचे काम संपवून ते कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने घरी जात असताना चालत्या रिक्षाने गुलमोहराचे झाड कोसळले आणी त्यांचे त्याच अपघाती निधन झाले.
मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी निवेदन
तुकाराम खेंगळे हे घरामधील कमावता व्यक्ती होते, त्यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता कक्षामधूनन आर्थिक मदत मिळण्यासाठी ‘मुंबई डबेवाला असोशिएशन’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.