
नागपूर प्रतिनिधी
नागपूर मधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे. काल सायंकाळी 6 वाजता सहा तरुणांनी अंकुश कडू यांची हत्या केली आहे.
भर रस्त्यावर कडू यांची दुचाकी थांबवून धारधार शास्त्राने त्यांच्यावर वार करत हत्या केली आहे. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला आहे.
‘जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा कयास’
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारी रोड वरील म्हाडा चौक इथं शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना येत आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, अंकुश कडू यांची नागपुरात भर रस्त्यात हत्या केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ही हत्या नेमकी का केली? या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस प्रशासन करत आहेत. हत्या करणारे आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. लवकरच आरोपींना पोलिस पकडतील असं सांगण्यात येत आहे. आरोपी पकल्यानंतरत हत्येचं नेमकं कारण काय? याची माहिती मिळू शकते. मात्र, या धक्कादायक घटनेनं नागपूर शहर हादरलं आहे.
महाराष्ट्राची उपराजधानीतील गुन्ह्यांचा मुद्दा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिल्या जात आहे. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये सभागृहांत दावे-प्रतिदावेदेखील होतात. दरम्यान, दिवसेंदिवस नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. गुन्हेगारीच्या घटना सातत्यानं वाढत आहेत, त्यामुळं नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, लहानसहान कारणांवरून हत्येच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांचीदेखील नोंद झाली आहे.
दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशा घटना घडनू नये म्हणून पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे. दरम्यान, नागपुरात दंगलीच्या घटनेनंतर पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबर घेत आहेत. मात्र, आज अचानक . शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यात हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावर निर्माण झालं आहे,