
मुंबई प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक ९३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जयंती उत्सवास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विभागप्रमुख आमदार अनिल परब, आमदार वरुण सरदेसाई आणि उपविभागप्रमुख शशिकांत येलमकर यांनी भेट दिली.
या प्रसंगी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थित स्थानिक नागरिकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रभागातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले असून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.