
परभणी प्रतिनिधी
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणाला अनेक तर्क-वितर्क लावले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नसल्याचे सांगितले होते.
पण, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाला आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत, असे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आले आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. आयोगानेही त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला होता.
‘परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली,’ असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे.