
रायगड प्रतिनिधी
महाराष्ट्रात पुन्हा एकदा ST बसचा भीषण अपघात झाला आहे. रायगडच्या वरंध घाटात ST बस 50 फूट खोल अडकून पडली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.
रायगडच्या वरंध घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात जाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वरंध घाटात अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली उतरली. वरंध घाट हा रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे.
अपघात ग्रस्त बस सुनेभाऊ या गावातून महाडकडे येत होती. अपघात काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.