
पत्रकार उमेश गायगवेळे
बिहार येथील गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. यासाठी वांद्रे पूर्व विधानसभेतील शेकडो बौद्ध बांधवांनी बुधवारी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात बौध्द बांधवासह महिलांही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोर्चाचे नेतृत्व भिमराव आंबेडकर यांनी केले सिद्धार्थ काँलनी, वांद्रे पूर्व येथील डांँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्विस रोडला लागून असलेल्या तैलचित्रा जवळून मोर्चाला सुरुवात झाली.भर उन्हात निघालेल्या मोर्चात शेकडो बौद्ध बांधव तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत तसेच बौद्धगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करावा, तसेच महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा घोषणा देत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.