
मुंबई प्रतिनिधी
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगावमधील मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. १४३ एकरवर असलेल्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक ३६ हजार कोटींची बोली लावली आहे.
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगावमधील मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. १४३ एकरवर असलेल्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक ३६ हजार कोटींची बोली लावली आहे.या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या १३. २९ टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर ३ लाख ८३ हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने १३. ७८ टक्के अर्थात ३ लाख ९७ हजार १०० चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.लवकरच निविदा अंतिम करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणारया पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी समूहाला विक्रीसाठी १८ लाख ८० हजार चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होईल.
मोतीलाल नगर-१, २ आणि ३ हा मुंबईतील सर्वात मोठ्या निवासी पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक आहे. जो गोरेगाव (पश्चिम) च्या पश्चिम उपनगरात १४३ एकर जागेवर पसरलेला आहे. या प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने (एपीपीएल) सर्वात मोठी बोली लावली. प्रतिस्पर्धी कंपनी एल अँड टीच्या तुलनेत अधिक निर्मिती क्षेत्राचा प्रस्ताव अदानी प्रॉपर्टीजकडून मांडण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प अदानी समूहाला मिळाला. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पानंतर, अब्जाधीश गौतम अदानी यांचा समूह मुंबईतील मोतीलाल नगरच्या ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक बोली लावणारा म्हणून उदयास आला आहे. मोतीलाल नगरला आधुनिक अपार्टमेंटमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
अदानी समूहाचा मुंबईतील हा दुसरा मेगा पुनर्विकास प्रकल्प असेल. ते आधीच मुंबईतील आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा पुनर्विकास करत आहे. धारावी, वांद्र रेक्लमेशन पाठोपाठ मुंबईतील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अदानी समूहाकडे गेला आहे. गोरेगाव पश्चिम येथील १४२ एकरांवरील मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची आर्थिक निविदा मंगळवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून खुली करण्यात आली. या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली.गोरेगावच्या मोतीलाल नगरमध्ये ३७०० गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन एकूण ५ लाख ८४ चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा लौकिक असणाऱ्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडूनच केला जात आहे. याशिवाय, एमएसआरडीसीच्या अखत्यारितील वांद्रे रेक्लमेशन परिसराचा पुनर्विकासही अदानी समूहाकडे आहे.तसेच अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विक्री करायच्या इमारतीचे बांधकाम अदानी समूहाला मिळाले आहे.