
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा शिर्डीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांना बेदम मारहाण केली, या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.
सगळा प्रकार पोलीस तपासून उघड झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मार्च रोजी शिर्डीत दत्तात्रय शंकर गोंदकर (वय 54 वर्ष ) यांचा मृत्यू झाला होता. पण त्यांच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पण घटनेचा पोलीसांनी सखोल तपास केला असता त्यांचा मुलगा शुभम गोंदकर यानेच हत्या केल्याचं उघड झालं. घरगुती वादातून शुभमने आपल्या वडील दत्तात्रय यांना पाईपने जबर मारहाण केली होती.
पण ही घटना लपवण्यासाठी अकस्मात मृत्यू झाला असं सांगतील. पण जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा दत्तात्रय गोंदकर यांचा पाच दिवसांनी अहवाल आला. यामध्ये बेदम मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा वडिलांच्या हत्येची कबुली दिली.
घरात त्या दिवशी काय घडलं?
6 मार्च २०२५ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शुभम आणि वडील दत्तात्रय गोंदकर यांच्यामध्ये घरगुती वादातून भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की, शुभमने पाईपने वडिलांना बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाला. पण आपल्या हातातून बापाचा खून झाला हे कुणाला कळू नये म्हणून वडिलांचा मृत्यू झाला अशी माहिती शुभम सगळीकडे देत होता. पोलिसांनी दत्तात्रय गोंदकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आज जेव्हा अहवाल समोर आला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी आता शुभमला ताब्यात घेतलं आहे, त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.