
मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील इराणी वाडी परिसरात देखील राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सक्रिय असलेल्या चुहा गॅंग ची परिसरात प्रचंड दहशत या गॅंगचा प्रमुख असलेला शिवसेना शिंदे गटाचा विभाग प्रमुखास खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
खंडणी, झोपडपट्ट्यांमधील जागा हडप करणे आणि धमकावणे अशा प्रकारचे 35 पेक्षा अधिक गुन्हे या चुहा गँगवर आहेत. या गॅंगचा प्रमुख असलेल्या लालसिंग राज पुरोहित याला कांदिवली पोलिसांनी काल रात्री फसवणूक आणि अनधिकृत कब्जा प्रकरणे गुजरात येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून कांदिवली पश्चिमेकडील इराणी वाडी परिसरात रामकिशन चव्हाण उर्फ चुहा हा आपल्या 20 ते 25 गुंड मित्रांच्या मदतीने परिसरात दहशत करत होता.
याच टोळीचा एक भाग असलेला लालसिंग राज पुरोहित हा शिवसेना शिंदे गटाचा कांदिवली विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होता. याने याच टोळीच्या मदतीने परिसरात झोपडीधारकांच्या झोपड्या अनधिकृतपणे कब्जा मारणे, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहन मालकांकडून अनधिकृत पे अँड पार्किंग चे पैसे वसूल करणे एकच करून अनेक लोकांना विकणे खंडणी आणि ड्रग्स विक्री करण्याचे काम करत होता.
ही कामे करण्यापूर्वी तो पोलिसांचा खबरी म्हणून देखील काम पाहत होता याच कामातून त्यांनी पोलिसांची ओळख वाढवून त्याचा गैरफायदा घेत वरील सर्व कृती केली असल्याच समजते. लालसिंग राजपुरोहित ने पै कुटुंबीयांचा इराणी वाडीतील गाळा सुरुवातीला भाड्याने घेतला काही महिने भाड्याचे पैसे वेळेवर दिले मात्र लॉकडाऊन काळात पैसे थकवण्यात आले आणि त्याच काळात दत्ताराम यांना पक्षाघाताचा झटका आला आणि उपचारासाठी त्यांना अंधेरीतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारासाठी 25 लाखापेक्षा अधिक रुपये खर्च झाल्याने पैशाची गरज वाटू लागली म्हणून पै कुटुंबीयांनी तो गाळा विकण्याचे ठरवले.
ही गोष्ट लालसिंग राजपुरोहित याला समजल्यानंतर त्याने तो गाळा विकत घेण्याचे ठरवले मात्र यासाठी 57 लाख रुपये तुम्हाला देऊ असे लालसिंग राजपुरोहित याने पै कुटुंबीयांना सांगितले यासाठी करार केल्यानंतर पै कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्यात आले आणि उर्वरित पैसे ९० दिवसात देऊ असे म्हटले मात्र 90 दिवस उलटून गेल्यानंतरही लालसिंग राजपुरोहित याने पैकुटुंबीयांना व्यवहारातील ठरलेले पैसे दिले नाहीत.