
पत्रकार उमेश गायगवळे
मतदार राजाने मला निवडून देऊन संसदेत पाठवण्याचं जे काम केलं त्या कामाची पोचपावती मी नक्कीच देणार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असणार असून माझ्या या कार्यालयातून सदैव आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी उपलब्ध राहील अशी ग्वाही खा.वर्षाताई गायकवाड यांनी दिली.
सांताक्रुज पूर्व येथील कालिना येथे खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महिलादिनी करण्यात आलं याप्रसंगी वांद्रे, खार, सांताक्रुज, वाकोला कालीना, भारत नगर, धारावी येथील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.