
पुणे प्रतिनिधी
घरी कोणीही नसताना एका 32 वर्षीय महिलेने घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोन्हेरी, ता. मोहोळ येथे शनिवार ता. 8 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता घडली.
मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कविता बबन कांबळे, रा. कोन्हेरी असे मृत महिलेचे नाव आहे. जागतिक महिला दिनीच एका महिलेने गळफास घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कोन्हेरी येथील बबन कांबळे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. 8 मार्च रोजी बबन कांबळे हे नेहमी प्रमाणे सकाळी 8.30 वाजता सापटणे, ता. माढा येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी अडीच वाजता बबन यांना त्यांच्या बहिणीने फोन केला व कविताने गळफास घेतल्याचे सांगितले.
तातडीने बबन कोन्हेरी येथे घरी आले व नातेवाईकांच्या मदतीने फासावर लटकलेली कविता हिला खाली उतरले. तिला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
या घटनेची खबर बबन महादेव कांबळे (वय-50) रा. कोन्हेरी यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास अंमलदार संतोष चव्हाण करीत आहेत.