
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमच्या बाथरूममध्ये तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. हाताची नस कापून घेतलेली तरुणी रक्ताच्या थारोळ्यात आढळली. तिनं बाथरूमच्या फरशीवर आय एम सॉरी असंही लिहिलं होतं.
हाताची नस कापलेल्या अवस्थेत तरुणी सापडल्यानं खळबळ उडाली. अद्याप या प्रकरणी अधिक माहिती समोर आलेली नाही. पोलीसात या प्रकरणी नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे.
सीएसएमटी स्थानकात असलेल्या बाथरूममध्ये तरुणीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी १२ ते २ च्या सुमारास ही घटना घडली. तरुणीने सीएसएमटी स्टेशनच्या बाथरूममध्ये जाऊन हाताची नस कापून घेतली. बाथरूममध्ये फरशीवर ती पडली होती. तिनं हाताची नस कापल्याचं लक्षात येताच तिथल्या महिलांनी पोलिसांशी संपर्क साधला.
तरुणीला पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तिची ओळख पटलेली नाही. मात्र वय २० ते २७ दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला? ती मुलगी कोण आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. पोलिसांनी अद्याप काही माहिती दिलेली नाही.