
मुंबई प्रतिनिधी
आजारी पडल्यावर आपल्याला डॉक्टरकडून गोळ्या औषधांची मोठी यादी दिली जाते. औषध निर्मात्या कंपन्यांकडून यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांना ही औषधे परवडणारी नसतात.
पण आता सर्वसामान्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण सरकारने यासंदर्भात नियम बनवला आहे. याद्वारे 53 औषधांचे दर आटोक्यात येणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वेदना, ताप, संसर्ग, मल्टीविटामिन, कॅल्शियम डी३, मधुमेह, हृदय आणि इतर जीवनशैली आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारने अशा 53 नवीन औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत.
या निर्णयामुळे कंपन्या ठरल्यापेक्षा जास्त किमतीत ही नवीन औषधे विकू शकणार नाहीत. यासंदर्भात राष्ट्रीय औषधनिर्माण किंमत प्राधिकरण म्हणजेच एनपीपीएने एक नोटिफिकेशन जारी केली आहे. ज्यामध्ये 53 नवीन औषधांच्या किमती निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे.
एनपीपीएच्या नोटिफिकेशननुसार कंपन्या निश्चित किमतीपेक्षा जास्त शुल्क आकारू शकणार नाहीत. कंपन्या सरकारने निश्चित केलेल्या 53 औषधांच्या किमतींवर फक्त जीएसटी आकारू शकतील. जर कंपन्यांनी जीएसटी भरला असेल तरच त्या ग्राहकांकडून औषधांच्या निश्चित किमतीवर तो वसूल करू शकतील, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
बहुतेक लोकांना वेदना, ताप, संसर्ग, मल्टीविटामिन, कॅल्शियम डी3, मधुमेह, हृदय इत्यादी जीवनशैलीशी संबंधित विविध आजारांसाठी औषधांची आवश्यकता असते. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व लोकांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
एनपीपीए ही एक सरकारी नियामक संस्था आहे. जी भारतातील औषधांच्या किमती नियंत्रित करते. ही संस्था रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत येते. औषधांच्या किमतींवर लक्ष ठेवणे आणि अनुसूचित नसलेल्या औषधांच्या किमतींवर लक्ष ठेवणे आणि सुधारात्मक कारवाई करणे हे प्राधिकरणाचे काम आहे. ही नियामक संस्था वेळोवेळी गरजेनुसार औषधांच्या किमती निश्चित करते. सरकारने घेतलेल्या यारण निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.