मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी २८ फेब्रुवारी २०२५ च्या मध्यरात्रीपासून १ मार्च २०२५ च्या पहाटे २:३० वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑल-आउट ऑपरेशन राबवले. पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती आणि सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण यांच्या नेतृत्वाखाली ही तीव्र कारवाई करण्यात आली, ज्यांनी स्वतः चौक्यांची पाहणी केली आणि पथकांनामार्गदर्शन केले.
ऑलआउट अंतर्गत करण्यात आलेली कारवाई
मुंबई पोलीसांच्या अभिलेखावरील तसेच फरार १२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
४६ जणांवर अजामीनपात्र वॉरंटसंदर्भात कारवाई करण्यात आली.
अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणा-यांवर १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकुण १६ जणांवर कारवाई करून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
अवैध दारू विक्री /जुगार इ.अवैध धंदयांवर १४ ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले आहेत.
मुंबई शहराबाहेर हद्दपार केलेले, पंरतु मुंबई शहरातऑपरेशन ऑल आऊट दरम्यान विना परवाना प्रवेश केलेले एकुण ५४ तडीपार आरोपींवर मपोका. कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे
महाराष्ट्र (मुंबई ) पोलीस कायदयाचे कलम १२० व १२२ अन्वये संशयितरित्या वावरणारे एकुण ५६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
मुंबई शहरात एकुण २०७ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले , त्यामध्ये अभिलेखावरील अनेक आरोपी तपासण्यात आले .
सर्व पोलीस ठाण्यांचे हददीत एकुण ११३ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.
त्यामध्ये एकुण ६९०१ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
मोटारवाहन कायदयान्वये १८९१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली
कलम १८५ मो.वा.का. अन्वये ७० मध्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.


