
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने एडीजी निखिल गुप्ता आणि एडीजी (महामार्ग पोलिस) सुरेश मेखला यांच्यासह 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
राज्य गृह विभागाच्या आदेशानुसार गुप्ता यांना एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर मेखला यांना एडीजी (आर्थिक गुन्हे शाखा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तथापी, महाराष्ट्र सायबरचे विशेष महानिरीक्षक यशस्वी यादव यांना त्याच पदावर एडीजी म्हणून बढती देण्यात आली आहे.
आयजीपी (नागरी हक्क संरक्षण) असलेले सुहास वारके यांना पदोन्नती देऊन एडीजी कारागृह म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आयजीपी (महिला आणि मुलांवरील अत्याचार प्रतिबंधक) असलेल्या अश्वती दोर्जे यांना त्याच पदावर एडीजी म्हणून बढती देण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती) दरम्यान, छेरिंग दोर्जे आयजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) यांना एडीजी (विशेष ऑपरेशन्स) म्हणून बढती देण्यात आली आहे, तर आयजीपी (आस्थापना) म्हणून कार्यरत असलेले केएमएम प्रसन्ना यांना एडीजी (प्रशासन) म्हणून बढती देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेले मनोज कुमार शर्मा यांना आयजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे.
गणेशोत्सव, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृह विभागाचा मोठा निर्णय) राज्य गुप्तचर अकादमीचे संचालक असलेले आर. बी. डहाळे यांची पुणे येथील राज्य गुन्हे नोंद केंद्राचे विशेष आयजीपी म्हणून बदली करण्यात आली आहे, तर एसआरपीएफचे आयजीपी असलेले अशोक मोराळे हे पुण्यातील मोटार वाहतूक विभागाचे नवे आयजीपी आहेत. डीआयजी (एसआरपीएफ) राजीव जैन यांना त्याच पदावर आयजी म्हणून बढती देण्यात आली आहे. अभिषेक त्रिमुखे यांना मुंबईतील अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गडचिरोलीतील अहेरी येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना बुलढाणा येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.