
पत्रकार:उमेश गायगवळे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या अंतर्गत महापालिकेच्या एबी आणि सी विभागातून जाणाऱ्या कुतुब ए कोंकण मगदूम अली नाही उड्डाणपुल पूल ते जे जे उड्डाणपूल खालील दुभाजकाचे संकल्पना आधारित (थिम बेस्ड) सुशोभीकरण करावे ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध ठरु शकणारी झाडे लावावीत, आकर्षक बागकामे, (लँडस्केपिंग) करावी एकसमान रचनेचे मजबूत संरक्षण कठडे (रेलिंग) उभारावे, त्याचबरोबर उड्डाणपुलाखाली तीन ठिकाणी बेसच्या कालबाह्य डबल डेकर बस गाड्यांमध्ये कला झालं आर्ट गॅलरी उपग्रह वाचनालय अशा खास सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जावी मंजूर केलेल्या संकल्पनेनुसार ते विकसित करावे त्यांचे संचालन ही स्वयंसेवी संस्था महिला बचत गट मार्फत करावं असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. यावेळी विभागाचे सहाय्यक आयुक्त शंकर भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.