
ठाणे प्रतिनिधी
ठाणे पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत येणाऱ्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा बाबुराव शिंदे यांनी प्रतिष्ठेचा महाराष्ट्र श्री किताब पटकावला असून ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विदमाने पुण्यातील येऊन थेऊर येथे झालेल्या महिला शरीर सौरष्ट स्पर्धेत 2025 चा मान मिळवला रेखा शिंदे यांनी यापूर्वी विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे तिने हरियाणा येथील झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आणि ट्रॉफी महाराष्ट्र पोलीस गेम्स 2023 सुवर्णपदक बॉडी चॅम्पियनशिप जिंकली 2024 मध्ये लखनऊ येथील ऑल इंडिया पोलीस गेम्स रेसलिंग क्लस्टर मध्ये रौप्य पदक आणि नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र पोलीस गेम्स 2024 मध्ये सुवर्णपदक मिळवले तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ठाणे पोलीस आयुक्त अशुतोष डोंगरे यांनी तिचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या