ठाणे प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा टाळून थेट पक्षाच्या शाखा, उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेनुसार गुरुवारी (आज) सायंकाळी पाच वाजल्यापासून राज ठाकरे ठाण्यात मनसेच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांना आणि शाखांना भेट देणार आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची आघाडी झाली आहे. मात्र, शिंदे गटाचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ठाणे महापालिका निवडणूक सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या परिस्थितीत मनसेने ठाण्यात तब्बल २८ मराठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, या उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मनोबल वाढवणे आणि संघटनात्मक आढावा घेणे हा राज ठाकरे यांच्या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
राज ठाकरे यांचा हा दौरा सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून, शहरातील विविध प्रभागांमध्ये ते उमेदवारांच्या कार्यालयांना आणि शाखांना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान स्थानिक प्रश्न, प्रचाराची दिशा आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
१) प्रभाग क्रमांक १९ – मनसे उमेदवार प्रमिला विकास मोरे, इटरनिटी मॉल, तीन हात नाका.
२) प्रभाग क्रमांक १७ – मनसे उमेदवार पूजा किरण ढमाळ, किसन नगर नाका.
३) प्रभाग क्रमांक १६ – मनसे उमेदवार रश्मी राजहंस सावंत व आरती रोशन पाटील, आयटीआय चौक, वागळे इस्टेट.
४) प्रभाग क्रमांक १५ – मनसे उमेदवार पवन पडवळ, साठे नगर नाका, वागळे इस्टेट.
५) प्रभाग क्रमांक ७ – मनसे उमेदवार स्वप्नाली खामकर-पाचंगे, पक्ष कार्यालय, साईबाबा मंदिराजवळ, वर्तक नगर नाका.
६) प्रभाग क्रमांक ५ – मनसे उमेदवार पुष्कराज विचारे, पक्ष कार्यालय, श्री समर्थ सोसायटी, गजानन महाराज मंदिर रोड, शिवाई नगर.
७) प्रभाग क्रमांक ४ – मनसे उमेदवार प्रतीक्षा डाकी, टायटन हॉस्पिटल, मानपाडा.
८) प्रभाग क्रमांक २ – मनसे उमेदवार अभिषेक रजक, मनसे शाखा, वामन नगर, वाघबीळ; तसेच मनसे उमेदवार रविंद्र मोरे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार कविता पाटील यांचे निवडणूक कार्यालय, ब्रह्मांड चौक.
९) प्रभाग क्रमांक ३ – मनसे उमेदवार निलेश चव्हाण, पक्ष कार्यालय, मनोरमा नगर-मानपाडा.
१०) प्रभाग क्रमांक ८ – मनसे उमेदवार सचिन कुरेल, माजिवडा चौक.
११) प्रभाग क्रमांक १२ – मनसे उमेदवार रक्षा दिनेश मांडवकर, मनसे नाका, पाचपाखाडी; तसेच उमेदवार रूपेश जाधव, मनसे शाखा, टेकडी बंगला.
१२) प्रभाग क्रमांक २२ – मनसे उमेदवार रविंद्र सोनार, पक्ष कार्यालय, पितृछाया सोसायटी, राघोबा शंकर पथ, फूल बाजार.
१३) प्रभाग क्रमांक २० – मनसे उमेदवार सविता मनोहर चव्हाण व राजश्री सुनील नाईक, अष्टविनायक चौक, कोपरी.
महापालिका निवडणुकीत थेट जनसंपर्कावर भर देण्याची ही रणनीती असून, राज ठाकरे यांच्या या शाखा-दौऱ्यामुळे ठाण्यातील निवडणूक प्रचाराला नवी दिशा मिळेल, असा पक्षाचा दावा आहे.


