
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील कोथरूड येथे एका तरूणावर काही अल्पवयीन मुलांनी हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
ही घटना आशिष गार्डन समोर बुधवारी घडली होती. राहुल जाधव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
सर्व हल्लेखोर हे अल्पवयीन आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.
काय आहे घटना ?
राहुल जाधव याची हत्या करणारे चारही आरोपी अल्पवयीन असून ते राहुल याचे मित्र आहेत. हत्या झालेल्या राहुल जाधवचे आरोपींपैकी एकाच्या आईसोबत प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधांची कुणकुण त्यांना लागल्याने त्यांनी मिळून राहुलला संपवण्याचा कट रचला. आरोपी हे राहुलच्या मागावर होते. कोथरूड परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास राहुल हा त्याच्या दुचाकीवरुन सागर कॉलनीमध्ये आला होता. यावेळी त्याला तिघांनी अडवले. आरोपींनीकडे कोयते होते. त्यांनी कोयत्याने राहुलवर सपासप वार केले केले. या घटनेत राहुल जाधव हा गंभीर जखमी झाला होता. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.