मुंबई प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना, वांद्रे येथील कु. स्पर्श विनायक पाटील यानेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
आय. ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा पूर्व येथील विद्यार्थी असलेल्या स्पर्शने दहावीच्या परीक्षेत ८३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक प्रगतीसोबतच तो तलवारबाजी (फेन्सिंग) या क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय खेळाडू असून, खेळ आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्याने हे यश मिळवले आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर स्पर्शने हे यश संपादन केल्याने त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्याचे वडील विनायक पाटील हे अखिल भारतीय काँग्रेसच्या वांद्रे विधानसभा रोजगार विभागाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
स्पर्शच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, पुढील काळात क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत तो अधिक उंच भरारी घेईल, असा विश्वास शिक्षक व नातेवाईकांनी व्यक्त केला.


