कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर बदली आदेश काढण्यात आले असून एकूण २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२ पोलिस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये तसेच विशेष शाखांमध्ये या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सायबर पोलिस ठाणे, विमानतळ सुरक्षा, नियंत्रण कक्ष यांसारख्या संवेदनशील विभागांसह शाहूवाडी, राधानगरी, गोकुळ शिरगाव, शहापूर, चंदगड, शिवाजीनगर आदी प्रमुख पोलिस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बदली आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची नियुक्ती अखेर पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
या बदल्यांमध्ये पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये संजय हारुगडे यांची नियंत्रण कक्षातून सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. राजेंद्र सावंत्रे यांची शाहूवाडी पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. अजित सिद यांना पोलिस कल्याण उपक्रमात तर नामदेव शिंदे यांना विमानतळ सुरक्षा विभागात जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच सतीश होडगर (सायबर पोलिस ठाणे) यांची राजारामपुरी पोलिस ठाण्यात, सत्यवान हाके (जयसिंगपूर पोलिस ठाणे) यांची हुपरी पोलिस ठाण्यात, सचिन सूर्यवंशी (शहापूर पोलिस ठाणे) यांची राधानगरी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. गजेंद्र लोहार (जिल्हा विशेष शाखा) यांची शहापूर पोलिस ठाण्यात, निगाप्पा चौखंडे (हुपरी पोलिस ठाणे) यांची चंदगड पोलिस ठाण्यात, संतोष गोरे (राधानगरी पोलिस ठाणे) यांची जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तर विश्वास पाटील (चंदगड पोलिस ठाणे) यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये नागेश यमगर (आजरा पोलिस ठाणे) यांची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. शीतलकुमार कोल्हाळ (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष) यांचीही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. कैलास कोडग (कोडोली पोलिस ठाणे) यांची इस्पुर्ली पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
क्रांती पाटील (इस्पुर्ली पोलिस ठाणे) यांची मुरगूड पोलिस ठाण्यात, शिवाजी करे (मुरगूड पोलिस ठाणे) यांची करवीर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. रविराज फडणीस (वाचक शाखा) यांची कोडोली पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बसूम मगदूम (गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे) यांची शाहूपुरी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
तसेच अतुल कदम (नियंत्रण कक्ष) यांची नेसरी पोलिस ठाण्यात, बाबासाहेब सरवदे (करवीर पोलिस ठाणे) यांची आजरा पोलिस ठाण्यात, भारत साळुंखे (राजारामपुरी पोलिस ठाणे) यांची गगनबावडा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. चेतन मसुटगे (नेसरी पोलिस ठाणे) यांची गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.
याशिवाय धोंडीराम वाळवेकर (नियंत्रण कक्ष) यांची वाचक शाखेत, रितल परुळे (शिवाजीनगर पोलिस ठाणे) यांची अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षात बदली करण्यात आली आहे. मुदस्सर शेख (शाहूपुरी पोलिस ठाणे) यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला उपनिरीक्षकाची बदली
दरम्यान, महिला पोलिस उपनिरीक्षक मृणालिनी पाटील (नियंत्रण कक्ष) यांची इचलकरंजी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाने काढलेल्या या बदल्यांमुळे विविध पोलिस ठाण्यांमधील मनुष्यबळाचे संतुलन राखण्यास तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


