सातारा प्रतिनिधी
सातारा तालुका पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंचायत समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पंचायत समितीच्या सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव तसेच पंचायत समिती सदस्य म्हणून प्रभाकर पवार यांची निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वातून सातारा तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
या प्रसंगी सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, लक्ष्मण कडव, जयवंत गाडे, मानाजी निंबाळकर, बाबुराव गाडे, प्रीतम चोरगे, जितेंद्र जाधव, संदीप गायकवाड, राजेंद्र गाडे, किशोर गाडे, फारुख खान, जावेद पठाण, अक्षय गुजर, किरण गाडे, अमर चोरगे, मधुकर निंबाळकर, रितेश जाधव, वैभव ननावरे, बाळासाहेब ननावरे, लक्ष्मण गाडे आदी उपस्थित होते.


