सातारा प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्य व स्थानिक पातळीवरील विकासकामे, नागरिकांच्या सुविधा तसेच भविष्यातील विविध उपक्रमांबाबत सकारात्मक विचारमंथन झाले. सातारा परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरेल, असा विश्वास खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला.
यावेळी सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, सातारा नगरपरिषदेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक शंकर माळवदे, पंकज चव्हाण, नगरसेविका सिद्धी पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत ढाणे बापू, माजी नगरसेवक किशोर शिंदे, नासीर शेख, अॅड. अंकुश जाधव, अॅड. विनीत पाटील, सुशांत निंबाळकर, मनीष शेठ महाडवाले, तेजस जगताप आदी उपस्थित होते.


